विमानचलन सुरक्षा शुल्कात 150 रुपयांपर्यंत वाढ; जुलैपासून विमान प्रवास महागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

नवी दिल्ली : प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या विमानचलन सुरक्षा शुल्कात (एएसएफ) 150 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे विमान प्रवास किचिंत महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, "एएसएफ' आता प्रवासी सेवा शुल्काची (पीएसएफ) जागा घेणार आहे.

देशांतर्गत प्रवाशांना सध्या 130 रुपये "एएसएफ' शुल्क अदा करावे लागते. त्यात 1 जुलैपासून 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बदलानुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही यापुढे शुल्कापोटी 3.25 डॉलरऐवजी 4.85 डॉलर द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, विमानतळावर प्रवाशांना दिले जाणारे संरक्षण व सुविधांसाठी आतापर्यंत प्रवासी सेवा शुल्क वसूल करण्यात येत होते. मात्र आता त्यांना "एएसएफ' शुल्क अदा करावे लागणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live