इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याला अटक केलीय. मारवाह हवाई दलाच्या मुख्यालयातून त्याच्या मोबाइलवर महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढायचा. हे फोटे तो व्हॉट्सएपवरुन ISIला पाठवायचा अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलीय. अरुण मारवाहच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर इंडियन एअर फोर्सनं 31 जानेवारीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याला अटक केलीय. मारवाह हवाई दलाच्या मुख्यालयातून त्याच्या मोबाइलवर महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढायचा. हे फोटे तो व्हॉट्सएपवरुन ISIला पाठवायचा अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलीय. अरुण मारवाहच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर इंडियन एअर फोर्सनं 31 जानेवारीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ISIने फेसबुकवरुन अरुण मारवाहला हनी ट्रॅपच्या जाळयात ओढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ISI एजंट्सनी मॉडेल असल्याचं भासवून त्याला भुरळ घातली. आठवडाभर लैंगिक भावना, उत्तेजना चाळवणारे चॅट केल्यानंतर तो IAFच्या युद्ध सरावाची माहिती द्यायला तयार झाला. या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेले नाहीत. फक्त सेक्स चॅटच्या मोहापायी तो ही गुप्त माहिती ISIला देत होता.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live