5 वर्षांनंतर अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा

सरकारनामा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पुणे : पाच वर्षांच्या खंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत.राज्यातील पालकमंत्र्यांची यादी रात्री जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच आपण पुण्याचे पालकमंत्री होणार आहोत, असे पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

https://t.co/ZAUwtB1FaV

— MySarkarnama (@MySarkarnama) January 8, 2020

शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 12 व कॉंग्रेसकडे 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदे आली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कालवा समितीची बैठक पुण्यात झाली. त्यावेळी आमदार असलेल्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यास आक्षेप घेतला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आपण ही बैठक घेतल्याचे पवार यांनी सांगितले होते.

मुश्रीफ व सतेज पाटलांच्या वादात बाळासाहेब थोरात!https://t.co/Je7pMqhBfO

— MySarkarnama (@MySarkarnama) January 8, 2020

पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याशिवाय इतर कुणाकडेही जाऊ शकत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री होण्याआधीच पवार यांनी स्वत:ला पुण्याचे पालकमंत्री जाहीर केले होते. 1999 ते 2014 या पंधरा वर्षांच्या काळात पवार जवळपास 10 वर्षे पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. राज्याच्या राजकारणात पुण्याचे वेगळे महत्व आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्हा असल्याने साहजिकच पुण्याचा पालकमंत्री पवार यांच्याच राहिला आहे. त्यामुळे पवार यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. त्यामुळे पालकमंत्री म्हणून अनौपचारिकपणे अजित पवार यांनी याआधीच कामाला सुरवात केली आहे.

Web Title -  Ajit pawar again gardian minister of pun after 5 yeras gap 

संबंधित बातम्या

Saam TV Live