अजित पवार आणि फडणवीसांची अळीमिळी गुपचिळी?

मोहिनी सोनार
सोमवार, 9 डिसेंबर 2019

सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकं काय शिजतंय अशा चर्चा जोर धरतायत.

इकीकडे देवेंद्र फडणवीसांनी दावा केलाय, की भाजप जास्त काळ सत्तेपासून दूर राहू शकत नाही. आणि दुसरीकडे अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातून क्लीनचीट मिळालीय या सर्वांचा अर्थ अर्थ नेमका काय? या दोघांमध्ये नक्की काय गौडबंगाल आहे. याकडेच चर्चा चाललीय. मात्र आता राजकीय वर्तुळात यातून काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

दरम्यान आमदार संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नाला या दोन्ही बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एकाच कोचवर बसून या दोघा नेत्यांनी मनसोक्त गप्पाही मारल्या. माढ्यामध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या भेटीमध्ये दोघांचेही हावभाव, देहबोली सामान्य होती. दोघांमध्ये कोणताही ताण दिसला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे वऱ्हाडी मंडळी आणि राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

अजित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांनी सरळ अशा चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलंय. आणि आम्ही लग्नात एकत्र होतो. आमचे कोच एकच होते त्यामुळे आम्ही एकत्र बसलो असं स्पष्टीकरण अजित पवारंनी दिलंय. 

असं असलं तरीही पवार फडणवीसांनी एका रात्रीत केलेला खेळ जनता आणि सर्व पक्ष अजून विसरु शकत नाही. त्यामुळे त्यांच्या या एकत्र गप्पांचा अर्थ आता वेळ आल्यावरच कळेल.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

https://studio.youtube.com/video/5WkHXk8CXOc/edit

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Ajit pawar and devendra fadanvis on one stage.

संबंधित बातम्या

Saam TV Live