मराठा आंदोलकांच्या भेटीला अजित पवार आणि धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई : आझाद मैदानावर सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची आज (मंगळवार) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. 

राज्यभरातून आलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर दोन नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. प्रकृती ढासळल्याने काही उपोषणकर्त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही; उलट त्यांच्यावर उपोषण सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप अन्य आंदोलकांनी केला. हे उपोषण आज 11 व्या दिवशीही सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर अन्य नेतेही आंदोलकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस करत आहेत.

दरम्यान, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले होते. उपोषणकर्त्यांचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live