EXCLUSIVE VIDEO | अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड; अजित पवारांचं संपूर्ण भाषण

EXCLUSIVE VIDEO | अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड; अजित पवारांचं संपूर्ण भाषण

राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते झालेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं. 

काय म्हणालेत अजित पवार : 
जे पराभूत झाले आहेत त्यांनी नाऊमेद होऊ नये
अपक्ष सत्ताधारी पक्ष्याकडे झुकत असतात हा आमचा अनुभव आहे
अंडर करंट होता, काही तरी वेगळं होईल असं वाटत होतं
आम्ही उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत, अवकाळी पवसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात भेट घेणार
काही जीवाभावाचे सहकारी सोडून गेलेतम,  सर्वजण सोबत असते तर सरकार स्थावान करता आलं असतं 
आम्ही विरोधीपाक्षात बसणार 
यंदा, सत्ताधाऱ्यांना दिवाळीत गोड खाता आलं नाही  
आपण ज्यांना पाठिंबा दिला त्यांची संख्या 60 वर गेली आहे
काही ठिकाणी पोत्याने पैसे उमेदवारांना दिले
मला अजूनही खरं वाटत नाही, मला 1 लाख 65 हजार मताधिक्य मिळालं. 
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांची बहीण होती
पहिलं काका पुतण्या विरोधात असायचे आता भाऊ-बहीण आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधीमंडळ नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विधीमंडळ नेते पदाच्या शर्यतीत धनंजय मुंडेंचं नाव आघाडीवर होतं. याशिवाय जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या नावांचीही चर्चा होती.

या बैठकीआधी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी उमेदवारांचं त्यांच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर जंगी स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचं इथं औक्षण करण्यात आलंय. तुतारी वाजवून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं स्वागतही करण्यात आलंय. शरद पवार, अजित पवारांसह रोहित पवारही इथं उपस्थित आहेत.

तर दुपारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आगामी सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले. विधानभवनातील भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

Web Title : Ajit Pawar has been appointed as Legislative Party leader of Nationalist Congress Party

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com