मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र यायला हवे - अजित पवार 

मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र यायला हवे - अजित पवार 

मुंबई : मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र यायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनीही एकत्र यावे. त्यांचे गैरसमज दूर करू, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांची चर्चा झालेली आहे. आता उरलेल्या 4 जागांवर लवकरच चर्चा केली जाणार आहे. राज्यात मनसेबाबतही वेगवेगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे. राजू शेट्टींचे गैरसमज दूर केले जाईल. जर खरंच शिवेसना-भाजपचा पराभव करायचा असेल सेक्युलर विचारसरणी असलेल्यांना एकत्र आणले जावे, असे माझे मत आहे. तसेच यापूर्वी भाजपबाबत बोलणाऱ्यांना आता कळत आहे. अनेकजणांना एकत्र घ्यायला हवे. यापूर्वी मोदींना पाठिंबा देणारेच आता त्यांच्याबाबत काय बोलतात ते आपण पाहत आहोत. आता अशा सर्वांनी एकत्र यावे, असे मला वाटत आहे. 

दरम्यान, पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही सर्वजण होरपळून गेलो आहे. त्यामुळे आता बदल घडविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही ते म्हणाले. 

Web Title : Marathi news ajit pawar on MNS for loksabha elections 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com