अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी; अधिकृत आदेश आल्यानंतर सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई: मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश आल्यानंतर अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.

अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदी लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी सध्या या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान, सध्या मुख्य सचिवपदी असणारे यु. पी. एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे. यु. पी. एस मदान ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिल्याने अजोय मेहता यांना संधी मिळाली आहे.

Web Title : marathi news ajoy mehta to handle duties as chief secretory of the state soon  

संबंधित बातम्या

Saam TV Live