एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्‍चिम विदर्भात शिवसेनेची पाटी कोरी राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मे 2019

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्प्यातील मतदान आटोपले. त्यासोबतच निकालासंदर्भातील अंदाजही वर्तविले जाऊ लागले. विविध वाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष बघता विदर्भात शिवसेनेची पाटी कोरी राहणार असल्याचे दाखवत आहे. ते बघता पश्‍चिम विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि बुलडाणा या तिन्ही जागांवर शिवसेनेचा पराभव होईल, असे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच विविध लोकसभा मतदारसंघात कुणाला यश मिळणार आणि कुणाचा पराभव होणार याबाबतचे अंदाज वर्तविले जात आहे. सकाळ-सामसह विविध वाहिन्यांवर वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून पक्षांची स्थिती दर्शविली जात आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठावाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात निकालाचे चित्र काय राहील यासंदर्भात अंदाज वर्तविण्यात आले आहेत. विदर्भातील १० जागांपैकी चार जागांवर भाजपचा विजय होणार असे दर्शविण्यात आले आहे. या चार जागांमध्ये पश्‍चिम विदर्भातील भाजपच्या वाट्याला असलेली एकमेव अकोला लोकसभा मतदारसंघाच्या जागेचाही समावेश आहे. येथे संजय धोत्रे चवथ्यांदा निवडून येणार असल्याचे पोलमध्ये दर्शविण्यात आले आहे. 

त्यामुळे पुन्हा एकदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे खासदार होण्याचे स्वप्न भंगणार आहे. तीन जागा शिवसेनेच्या वाट्याला होत्या. त्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेले प्रतापराव जाधव, यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या जागा धोक्यात असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यापैकी यवतमाळ-वाशीमची जागा काँग्रेसच्या वाट्याला तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखविण्यात आल्या आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा विजय होणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या नवणीत राणा विजयी होणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. 

वऱ्हाडातील विद्यमान खासदार व एक्झिट पोलचे निकाल
मतदारसंघ            विद्यमान खासदार                 एक्झिट पोल
अकोला               संजय धोत्रे (भाजप)                 भाजप
बुलडाणा              प्रतापराव जाधव (शिवसेना)      राष्ट्रवादी काँग्रेस
यवतमाळ-वाशीम  भावना गवळी (शिवसेना)          काँग्रेस
अमरावती            आनंदराव अडसूळ (शिवसेना)   युवा स्वाभिमानी

Web Title : According to exit poll estimates, the Shiv Sena will remain the main constituency in western Vidarbha

संबंधित बातम्या

Saam TV Live