अायुक्तांच्या घरात साेडणार गाढव, जिल्हाधिकारी अास्तिकुमार पांडे यांच वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

अकाेला : अकोल्यात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर आहे. शुक्रवारी याचा एक किस्सा स्वतः अधिकारी, पदधिक्रयानी अनुभवला. अधिकारी, पदाधिकारी चर्चा करित असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात अचानक गाढव अाेरडायला लागले. गाढवाच्या कर्कश अावाजामुळे जिल्हाधिकारी अास्तिकुमार पांडे यांनी अाता सगळे गाढव पकडून मी महापलिका अायुक्तांच्या घरात साेडताे अशा शब्दात महापाैरंची फिरकी घेताच उपस्थित सारे हास्यविनाेदात रंगले. 

जिल्हयातील रस्त्यांचा अाढावा घेण्यासाठी शुक्रवारी खा. संजय धाेत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अाढावा बैठक घेतली. ही बैठक अाटाेपल्यावर खासदारांसह आमदार रणधीर सावरकर, गाेपीकिसन बाजाेरिया, गाेवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे हे सर्व निघून गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडे, पाेलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर अाणि महापाैर विजय अग्रवाल हे अाैपचारिक चर्चा करीत असताना त्यांच्या समाेर काही अंतरावर एक गाढव जाेरजोरात अाेरडायला लागले. गाढवाचे अाेरडणे बाऱ्याच वेळपर्यंत चालले.

गाढव शांत हाेताच जिल्हाधिकाऱ्यांनी हे गाढव कसे काय अालेत असा प्रश्न केला. अाता मी गावातले सारे माेकाट गाढव पकडून महापालिका अायुक्तांच्या घरात साेडताे असे जिल्हाधिकाऱ्यांनी महापाैरांना गमतीने म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सारे खळखळून हसायला लागले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live