वाढत्या तापमानामुळे शहरातील सिग्नल राहणार बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

अकोला : मागील दोन दिवसांपासून अकोल्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. यामुळे अकोलेकरांच्या जीवाची लाही-लाही होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानाची लाट पाहता वाहतूक विभागाने शहरातील सिग्नल 1 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालकांना आता भरउन्हात सिग्नलवर थांबण्याची गरज भासणार नाही. 

अकोल्यातील बुधवारी ४५.१ तर गुरुवारी ४६.३ सेल्सिअसवर शहराचे तापमान जाऊन पोहचले होते. या उष्ण वातावरणात ट्रॅफिक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनधारकांना चटके सहन करावे लागतात. यातून उष्माघाताचा संभव नाकारता येत नाही. तेव्हा वाढत्या तापमानापासून अकोलेकरांचा बचाव व्हावा, यासाठी वाहतूक विभागाने २६ एप्रिल ते १ मे या कालावधीत शहरातील १३ ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता.२६) होणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार सिग्नल बंदची मर्यादाही वाढविल्या जाणार आहे.

हे ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद

शहरातील जयहिंद चाैक, रतनलाल प्लॉट, अशोक वाटीका, नेहरू पार्क, पोस्ट अाॅफिस चौक,अग्रेसन चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, बसस्थानक चौक, टॉवर चौक, दुर्गा चौक, सिव्हिल लाईन्स चौक अाणि जठारपेठ चौकातील ट्रॅफिक सिग्नल एक मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

Web Title : marathi news akola rise in temperature few signals to remain off

संबंधित बातम्या

Saam TV Live