अकोल्यात ट्रॅक्टरचा फॅशन शो

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

सौंदर्यवतींचा फॅशन शो पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सरावलोत. सौंदर्यवती फॅशन शो मध्ये जश्या रॅम्प वॉक करतात तसाच रॅम्प वॉक अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये झाला. या रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाले होते ट्रॅक्टर.

अकोटमध्ये या हटके फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. एरव्ही शेतातल्या मातीशी नातं सांगणारे ट्रॅक्टर नटून थटून आणण्यात आले होते. या ट्रॅक्टरवर सामाजिक संदेशही देण्यात आले होते.

शेताशी, मातीशी नातं सांगणारा ट्रॅक्टर फक्त शेतकऱ्याची शान राहिलेला नाही. तर ट्रॅक्टर हा समाजाचा अभिमान झालाय हेच या फॅशन शोमधून दाखवण्याचा प्रयत्न झालाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live