पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने घेतलेली संपूर्ण मुलाखत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 एप्रिल 2019

नवी दिल्ली : मी खूप तरुण वयात घर सोडले. तरुणपणी सैन्यात जाण्याची इच्छा होती. पंतप्रधान होईन असे कधीच वाटले नव्हते. सामान्य नागरिकांच्या डोक्यात कधीच हा विचार येत नाही. माझी ही कौटुंबिक परिस्थिती आहे, त्यानुसार मला छोटी नोकरी लागली असती तरी आईने गावात गूळ वाटला असता. मी कोणाचा अपमान करत नाही. मला राग येते पण कधी व्यक्त करत नाही, अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

While the whole country is talking elections and politics, here’s a breather. Privileged to have done this candid and COMPLETELY NON POLITICAL freewheeling conversation with our PM @narendramodi . Watch it at 9AM tomorrow via @ANI for some lesser known facts about him! pic.twitter.com/Owji9xL9zn

— Akshay Kumar (@akshaykumar) April 23, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने मुलाखत घेतली. मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सर्व प्रश्न होते. त्यांनी अगदी लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सर्व आठवणींना या मुलाखतीतून उजाळा दिला. 

मोदींनी उत्तरे देताना म्हटले, की लहानपणापासून वाचनाचा छंद आहे.  मलाही आंबे खाण्याची आवड आहे. लहानपणी शेतात जाऊन झाडावर पिकलेले आंबे खाणे आवडत असे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे माझे कुटुंबीय नव्हते. त्यामुळे कधीच पंतप्रधान होईल, असे वाटले नव्हते. गुलामनबी आझाद यांच्यासारखे विरोधी पक्षातही माझे अनेक मित्र आहेत. ममता बॅनर्जी मला अनेक वर्षे कुर्ते भेट देत होत्या. मला पंतप्रधान झाल्यानंतर इतर पंतप्रधानांपेक्षा जास्त अनुभव होता. कारण, मी अनेकवर्षे मुख्यमंत्री राहिलेलो आहे. माझे अनेक मित्र मला सांगतात, तुम्ही जास्त वेळ झोप घ्या. ओबामांनीही मला हे सांगितले होते. पण, माझ्यात कामाची नशा आहे. त्यामुळे माझी जीवनशैलीच तशी झाली आहे. लहानपणी संघाच्या शाखेत विविध खेळ खेळलो.

Having a wonderful conversation with @akshaykumar. Do watch! https://t.co/3VWRUvWTng

— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 24, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने घेतलेली मुलाखत पाहा 

संबंधित बातम्या

Saam TV Live