VIDEO | अक्षयकुमारच्या जाहिरातीवरुन शिवप्रेमी संतापले

सागर आव्हाड
गुरुवार, 9 जानेवारी 2020

खिलाडी अक्षयकुमारवर शिवप्रेमी संतापलेत. अक्षयविरोधात तक्रार दाखल झालीय. काय केलंय अक्षयकुमारनं पाहा सविस्तर विश्लेषण...

 

खिलाडी अक्षयकुमारवर शिवप्रेमी संतापलेत. अक्षयविरोधात तक्रार दाखल झालीय. काय केलंय अक्षयकुमारनं पाहा सविस्तर विश्लेषण...

 

खिलाडी अक्षय कुमारनं केलेल्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. वॉशिंग पावरडच्या अक्षयनं केलेल्या एका जाहिरातीमुळे शिवप्रेमी संतापलेत, अक्षयविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्याचं झालं असं की अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्याच्या वेशात दाखवण्यात आलंय. मावळ्यांच्या कपड्यावरुन जाहिरातीत भाष्य करताना दाखवलं गेलंय. मावळ्यांना स्वत:चे कपडे वॉशिंग पावडरनं धुताना दाखवण्यात आलंय. शिवप्रेमींच्या भावना या जाहिरातीमुळे दुखावल्यात.
बाईट - 
सरकारनं वॉशिंग पावडरच्या या जाहिरातीवर लवकर बंदी आणावी अशी मागणीही करण्यात आलीय. लाखो मावळ्यांच्या रक्तानं हा महाराष्ट्र घडलाय. स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी या मातीवर रक्ताभिषेक करणाऱ्या मावळ्यांना वॉशिंग पावडरच्या एका जाहिरातीसाठी कपडे धुताना दाखवणं कितपत योग्य असा सवाल प्रत्येक मराठी माणूस विचारतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live