दारुची होम डिलीव्हरी;  ऑनलाईन मिळणार दारू?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तळीरामांसाठी एक आशादायक बातमी. तळीरामांना आता दारू पिण्यासाठी कुठंच जावं लागणार नाही. तळीरामांना आता घरबसल्या दारू प्यायला मिळणार आहे. एका कंपनीनं दारू ऑनलाईन पुरवण्याची परवानगी राज्य सरकारकडं मागितलीय. ही परवानगी मिळाल्यास एका क्लिकवर तळीरामांना दारूची बाटली त्यांच्या इच्छितस्थळी देण्याचा कंपनीचा मानस होता. पण सरकारनं तुर्तास तरी या प्रस्तावाला होकार दिलेला नाही.

यापूर्वी मुंबईत काहीजणांनी व्हॉट्सऍपवर दारू घरपोच पुरवण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारनं त्यांच्यावर कारवाई केली होती.

मिठापासून पिठापर्यंत सगळंच ऑनलाईन मिळत असताना आता दारूही ऑनलाईन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सध्या तरी ऑनलाईन दारूच्या प्रस्तावाला ब्रेक लागला असला तरी येत्या काही दिवसांत ऑनलाईन दारूचा प्रस्ताव नक्की मंजूर होईल अशी तळीरामांना आशा आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live