शेतकऱ्यांनो सावधान! सावधान! सावधान! राज्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

एकदा गारपिटीतून कसाबसा सावरलेल्या शेतकऱ्याच्या पोटात पुन्हा गोळा आलाय. कारण शुक्रवारपासून पुढच्या 48 तासांत गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होईल असा इशारा हवामानखात्यानं दिलाय. तिकडं प्रशासनानंही गारपिटीचा इशारा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायला सुरुवात केलीय. पीक कापलं असोल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवा, गीरपिट झाली तर कमीत कमी नुकसान कसं होईल याची दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. गारपिटीच्या इशाऱ्याच्या काळात शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाची कसोटी लागणार आहे. गेल्या काही वर्षांत सातत्यानं गारपिट होते.

एकदा गारपिटीतून कसाबसा सावरलेल्या शेतकऱ्याच्या पोटात पुन्हा गोळा आलाय. कारण शुक्रवारपासून पुढच्या 48 तासांत गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होईल असा इशारा हवामानखात्यानं दिलाय. तिकडं प्रशासनानंही गारपिटीचा इशारा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायला सुरुवात केलीय. पीक कापलं असोल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवा, गीरपिट झाली तर कमीत कमी नुकसान कसं होईल याची दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. गारपिटीच्या इशाऱ्याच्या काळात शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाची कसोटी लागणार आहे. गेल्या काही वर्षांत सातत्यानं गारपिट होते. त्यामुळं या संकटाशी मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झालीये.


संबंधित बातम्या

Saam TV Live