AN 32 विमानातील सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात अपघात झालेल्या भारतीय हवाई दलाच्या मालवाहतूक विमान एएन- ३२ मधील सर्व १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने याला दुजोरा दिला असून याप्रकरणी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, १५ सदस्याय बचाव पथक आज  सकाळी विमानाने अपघातग्रस्त ठिकाणापर्यंत पोहोचले होते. या बचाव पथकाला अपघातग्रस्त विमानातील एकही सदस्य जिवंत आढळून आला नाही. 

या अपघातात मृत झालेल्या १३ जणांपैकी ६ अधिकारी आणि ७ एअरमन होते. त्यामध्ये विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती आणि फ्लाइट लेफ्टनंट एम के गर्ग, वॉरंट ऑफिसर के के मिश्रा, सार्जंट अनूप कुमार, कोरपोरल शेरिन, लीड एअरक्राफ्ट मन एस के सिंह, लीड एअरक्राफ्ट मन पंकज, बिगर लढाऊ कर्मचारी पुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे.

आसाममधील जोरहाटमधून गेल्या सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले होते. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो होता. यासाठी नौदलाची एक तुकडी आणि इस्रोच्या उपग्रहाचीही मदत घेण्यात आली होती. अखेर मंगळवारी या विमानाचे काही अवशेष सापडले होते. विमानात ८ कर्मचाऱ्यांसह १३ प्रवासी होते.

web title: All 13 passengers die in AN 32 aircraft

संबंधित बातम्या

Saam TV Live