MPSCसह सर्व स्पर्धा परिक्षा स्थगित

साम टीव्ही
मंगळवार, 7 एप्रिल 2020

२२ मार्च च्या आयोगाच्या परिपत्रकानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २६ एप्रिलला, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट (ब) संयुक्त पूर्व परीक्षा १० मे रोजी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता लक्षात घेता या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. 

सध्या कोरोनामुळे सर्वच गोष्टींना ब्रेक लागलाय. दरम्यान शाळा, कॉलेजेस तर बंदच आहेत आता तर, स्पर्धा परिक्षाही स्थगित करण्यात आल्यात.

'कोरोना'चा राज्यातला वाढता प्रभाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यात होऊ घातलेल्या आपल्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. परिक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिर केलं जाईल असंही आयोगाने स्पष्ट केलंय. २२ मार्च च्या आयोगाच्या परिपत्रकानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २६ एप्रिलला, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट (ब) संयुक्त पूर्व परीक्षा १० मे रोजी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता लक्षात घेता या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. 

Web Title - MARATHI NEWS All competition exams with MPSC are postponed


संबंधित बातम्या

Saam TV Live