BIG BREAKING | हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एनकाउंटरमध्ये ठार

BIG BREAKING | हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एनकाउंटरमध्ये ठार

हैद्राबाद प्रकरणातील बलात्कारांच्या आरोपींची सर्वात मोठी बातमी येतेय.  नॅशनल हायवे 44 जवळ पोलिसांची चकमक झाली आणि या चकमकीत त्या चारही नराधमांचा खात्मा झालाय. देशातील कानाकोपऱ्यातून या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत होती. आणि यातच आता पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी गोळ्या घातून ठार केलंय.

हैदराबादमधील डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. निदर्यीपणे या डॉक्टरला जाळण्यात आलं होतं. यानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. या चारही आरोपींनी आपला गुन्हासुद्धा कबूल केला होता. मात्र त्यांना अजुनही कोणत्या शिक्षेची सुचना देण्यात आली नव्हती त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची भावना होती. अत्यंत निर्घृणपणे या नराधमांनी बलात्कार करुन डॉक्टरला जाळलं होतं. आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता.

दरम्यान या प्रकरणातील चारही आरोपी चकमकीत ठार झालेत. पोलिसांनी या चारही आरोपींना ज्या ठिकाणी घटना घडली तिथे तपासासाठी नेलं होतं. या ठिकाणाहून पळ काढण्याचा आरोपींकडून प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी करण्यात आलेल्या गोळीबारात हे सर्व आरोपी ठार झाल्या माहिती समोर येतेय. यामुळे तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हणता येईल. या आरोपींना शिक्षा व्हायला आणखी किती दिवस वाट पहावी लागली असती सांगता येत नाही. मात्र पोलिसांच्या या एनकाउंटरमध्ये नीच कृत्य करणारे आरोपी ठार झाल्याचं पाहून सर्वांनाच समाधान वाटेल यात शंका नाही. 

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाला जसजशी गती येत होती तसतशी नवनवी माहिती समोर आली होती. डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पसार झालेले नराधम घटनास्थळी परत आले होते. मृतदेह पूर्णपणे जळाला की नाही याची खातरजमा करण्यासाठी चौघांनीही पुन्हा त्या ठिकाणी येण्याची हिंमत केली होती. इतकंच नव्हे तर मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पीडितेलाही दारू पाजण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घाणेरड्या कृत्यानंतर त्यांना आज ठार करुन सर्वांना दिलासा मिळाला असेल. 

Web Title - All four accused in Hyderabad rape case killed in encounter

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com