VIDEO | शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडी पाहा एका क्लिकवर...

SaamTV
SaamTVSaamTV

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर दिवसभर नाट्यमय घडामोडींचा सिलसिला सुरूच होता. शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही केली होती आजही केली आहे. त्यात आता राष्ट्रवादीनेही बंडखोरी रोखण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय रात्री उशिरा घेतला. पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना एकत्र ठेवण्यापर्यंत अनेक घाडमोडी झाल्या आहेत.

शपथविधीनंतरच्या घडामोडी :

सकाळी 9 : अजित पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत 9.27 : जनतेच्या हितासाठी सरकार आवश्‍यक होते : सुधीर मुनगंटीवार  9.42 : अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, पाठिंबा नाही : शरद पवार 10.45 : स्थिर सरकार देण्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा 10.48 : 'वर्षा'वर भाजप नेत्यांची बैठक 10.58 : पक्षात आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांचे ट्विट 11.00 : बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दुपारी 12.48 : शरद पवार, उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद 3.53 : सुनील तटकरे, दिलीप वळसे हे अजित पवारांच्या भेटीला 4.30 : देवेंद्र फडणवीस भाजप मुख्यालयात, स्थिर सरकारची ग्वाही 5.15 : अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश 5.30 : राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com