अखेर खातेवाटप जाहिर, वाचा कोणाला कोणती खाती...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 जानेवारी 2020

मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम खातेवाटप आज (रविवार) अखेर जाहीर झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सहा दिवसांनंतर आज खातेवाटपाला मुहूर्त लागलेला पाहायला मिळतोय.

मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम खातेवाटप आज (रविवार) अखेर जाहीर झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सहा दिवसांनंतर आज खातेवाटपाला मुहूर्त लागलेला पाहायला मिळतोय.

गेले काही दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून नक्की कुणाला कोणतं खातं याबाबत बैठका घेतल्या गेल्या. खुद्द शरद पवार यांनी आज माध्यमांना खातेवाटप निश्चित झालंय याबाबत माहिती दिली होती. या आधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खातेवाटतापामुळे महाविकास आघाडीत कोणतीही अनबन नाही असं देखील सांगितलं होतं. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून सर्व ठीकठाक आहे असं सांगण्यात आलं. मात्र तरीदेखील शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाचा मुहूर्त लांबलेला पाहायला मिळाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तीनही पक्षांमधील काही पक्षांनी नाराजीचा सूरही लावला होता. 

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्यामुळे अनेक महत्त्वाची कामं देखील रखडली होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यांना एकाच वेळी अनेक खाती सांभाळायला लागत होती. त्यानंतर 36 मंत्र्यांना शपथ देत मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. आता अखेर या मंत्र्यांना खाती मिळाली आहे.. 

खातेवाटप जाहीर :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क आणि कायदा व सुव्यवस्था व इतर कोणत्याही मंत्र्याला नेमून न दिलेले

- उपमुख्यमंत्री अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)

- छगन भुजबळ - अन्न, नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण

- दिलीप वळसे पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क

- अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम

- सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

- जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

- नवाब मलिक - अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

- अनिल देशमुख - गृह

- बाळासाहेब थोरात - महसूल

- राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन

- राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण

- हसन मुश्रीफ - ग्रामविकास

- डॉ. नितीन राऊत - उर्जा

- वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण

- जितेंद्र आव्हाड - ग़ृहनिर्माण

- एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम

- सुनील केदार - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवककल्याण

- विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन

- अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

- उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण

- दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण

- संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

- गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता

- केसी पाडवी - आदिवासी विकास

-  संदिपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन

- बाळासाहेब पाटील - सहकार, पणन

- अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य

- अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स व्यवसाय, बंदरे विकास

- यशोमती ठाकूर - महिला व बालविकास

- शंकर गडाख - मृद व जलसंधारण

- धनंजय मुंडे - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य

- आदित्य ठाकरे -़ पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री -

1. अब्दुल नबी सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3.  शंभुराज शिवाजीराव  देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4.  ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. दत्तात्रय विठोबा भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8. संजय बाबुराव बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10. आदिती सुनिल तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Web Title: allocation of portfolios by Chief Minister Uddhav Thackeray is declared


Tags

मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra उद्धव ठाकरे uddhav thakare विकास मंत्रिमंडळ काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party शरद पवार sharad pawar मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar प्रशासन administrations छगन भुजबळ chagan bhujbal दिलीप वळसे पाटील अशोक चव्हाण ashok chavan सुभाष देसाई subhash desai जयंत पाटील jayant patil नवाब मलिक nawab malik कौशल्य विकास अनिल देशमुख anil deshmukh बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat औषध drug राजेश टोपे rajesh tope आरोग्य health कल्याण हसन मुश्रीफ hassan mushriff ग्रामविकास rural development नितीन राऊत nitin raut शिक्षण education जितेंद्र जितेंद्र आव्हाड jitendra awhad एकनाथ शिंदे eknath shinde नगर सुनील केदार व्यवसाय profession विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar भूकंप अमित देशमुख amit deshmukh उदय सामंत uday samant दादा भुसे dada bhuse सैनिक गुलाबराव पाटील पाणी water रोजगार employment अनिल परब anil parab संसद यशोमती ठाकूर yashomati thakur जलसंधारण धनंजय मुंडे dhanajay munde आदित्य ठाकरे aditya thakare पर्यटन tourism पर्यावरण environment बाबा baba उपक्रम पतंगराव कदम सुनिल तटकरे sunil tatkare allocation chief minister uddhav thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live