VIDEO | 'अजित पवारही राष्ट्रवादीसोबत' राजभवनावनर उपस्थित त्या आमदाराची प्रतिक्रीया

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यातील सत्ता नाट्यात अजित पवार यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील राजभवनावर उपस्थित होते. मात्र बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीसोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट करतानाच अजित पवारही राष्ट्रवादीसोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाबासाहेब पाटील यांनी सायंकाळी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. राजभवनावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांबरोबर बाबासाहेब पाटील दिसले होते. परंतु यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले असून आपणच काय अजित पवारही राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे.

मी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबतच आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत आहे मी पूर्वीही ही पक्षाच्या सोबत होतो आणि आता पण पक्षाचा सोबतच आहे, अशा आशयाची पोस्ट बाबासाहेब पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरू लिहत ते राष्ट्रवादी काँग्रेससोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अजित पवार यांच्यासोबत आम्ही सर्व पक्षासोबत आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उदगीर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संजय बनसोडे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. संजय बनसोडे हे अजित पवारांसोबत आहेत आणि ते शपथविधीनंतर गायब झालेत, अशी चर्चा होती. त्यांना मुंबईबाहेर नेलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. एकेक आमदार जपण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीनं सर्वस्व पणाला लावलेलं असताना, संजय बनसोडे हे एअरपोर्टजवळच्या सहार हॉटेलमध्ये असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली. त्यांच्या नेत्यांनी तात्काळ हॉटेल गाठलं आणि तिथून संजय बनसोडे यांना घेऊन ते थेट चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. 

Web Title: Also Ajit pawar With NCP Says MLA Bbabsaheb Pati

संबंधित बातम्या

Saam TV Live