अमळनेरमध्ये बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी यांची हत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील शिवाजी बगीचा परिसरात, मध्यरात्री बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी यांची हत्या करण्यात आली. बोहरी पायी चालत घरी जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अचानक झालेल्या या गोळीबारानंतही रक्तबंबाळ झालेले बोहरी, सर्व बळ एकवटून पेट्रोलपंपावर परतले. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या मालकाला पाहून पंपावरील नोकरही घाबरले. बाबाशेठ यांनी पिण्यासाठी पाणी मागितले आणि ते खाली कोसळले. दरम्यान, जखमी बाबा बोहरींना रूग्णालयात दाखल केले असता, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील शिवाजी बगीचा परिसरात, मध्यरात्री बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फ बाबा बोहरी यांची हत्या करण्यात आली. बोहरी पायी चालत घरी जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अचानक झालेल्या या गोळीबारानंतही रक्तबंबाळ झालेले बोहरी, सर्व बळ एकवटून पेट्रोलपंपावर परतले. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या मालकाला पाहून पंपावरील नोकरही घाबरले. बाबाशेठ यांनी पिण्यासाठी पाणी मागितले आणि ते खाली कोसळले. दरम्यान, जखमी बाबा बोहरींना रूग्णालयात दाखल केले असता, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्यावर गोळ्या झाडून फरार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live