लग्नाच्याच दिवशीही नवरदेव कामावर हजर होता; मात्र, खरं कळाल्यावर तो देखील चक्रावला 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

रोजगार हमी योजनेचे पुन्हा वाभाडे निघाले आहेत. अमरावतीत रोजगार हमीच्या नावाखाली चक्क मयतांच्या नावावर पैसे उचलले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवालासुद्धा लग्नाच्याच दिवशी कामावर हजर असल्याचं दाखवण्यात आलंय आणि हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे तो अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या वाठोडा गावात.

सतीश भुजाडे या नवविवाहिताचं नाव लग्नाच्या दिवशी रोजगार हमीच्या योजनेत आल्याने, तोही चक्रावला आहे.  केवळ एवढंच नव्हे तर 23 ऑक्टोबर 2015 रोजी मयत झालेले सुधाकर ठाकरे 20 मे 2017 ते 26 मे 2017 दरम्यान रोजगार हमी योजनेच्या कामावर असल्याची नोंद रजिस्टरमध्ये पाहायला मिळेतय..

गावातील अनेकांच्या नावे जॉब कार्ड बनवून अशाच पद्धतीने पैशाची उचल झाल्याचा आरोप होत आहे  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live