ऍमेझॉनवरून वापरकर्त्यांची माहिती लीक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. ऍमेझॉन या इ-कॉमर्स साईट वापरणाऱ्या काही वापरकर्त्यांची माहिती लीक झालीय. कंपनीनं तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे ऑनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

ऍमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याला स्वत:चा इ-मेल आयडी द्यावा लागतो. मात्र, कंपनीच्या चुकीमुळे जगभरातील काही वापरकर्त्यांचा इ-मेल आयडी आणि ऍमेझॉन आयडी फुटलाय.

अमेरिका आणि ब्रिटनमधल्या अनेक वापरकर्त्यांची माहिती फुटल्याचं  ऍमेझॉनकडून सांगण्यात आलंय. मात्र, यामध्ये नक्की किती लोकांची माहिती लीक झाली आहे हे मात्र कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान, झालेल्या घटनेमुळे ऍमेझॉनच्या भारतीय ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ऍमेझॉन डेटाचोरी ही फेसबुक आणि गुगल नंतरची सर्वात मोठी डेटाचोरी मानली जातेय.  

WebTitle : marathi news amazon hit by data leak 

संबंधित बातम्या

Saam TV Live