लग्नासाठी भामट्याकडून फसवणूक, पोलिस असल्याचं सांगून केलं लग्न

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात तो चौकीदार असल्याचे समोर आले आहे. 

किरण शिंदे (वय, २४) असे पोलिस कोठडीत हवा खाणाऱ्या भामट्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पुर्व परिसरात आरोपी किरण शिंदे या भामट्याने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अंबरनाथ पुर्व परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणीशी लग्न करण्यासाठी त्या तरूणीच्या घरच्यांशी बोलणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपी किरण याने मुलींच्या घरच्यांना आपण मुंबई पोलिस दलात क्राईम ब्रान्चमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्या मुलीच्या घरच्यांचा विश्वास संपादन करण्याकरीता व त्यांना भासवण्यासाठी किरण याने बनावट पोलिस खात्याचे ओळखपत्र व नंबर प्लेट बनवली. तसेच पोलिस खात्याचा खाकी गणवेश बनवून घेऊन तो गणवेश परिधान करून त्याने वर्दीतला फोटो मुलीच्या घरच्यांना दाखविला. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर किरण याने २०१८ ला डिसेंबर महिन्यात त्या तरूणीशी लग्न केले. मात्र लग्नानंतर चारच महिन्यात किरण हा पोलिस दलात नोकरीला नसल्याचे त्या तरूणीला समजताच तिला धक्काच बसला. 

आरोपी किरण याने पोलिस असल्याची बतावणी करून आपली व आपल्या घरच्यांची फसवणूक केल्या प्रकरणी त्या तरूणीने थेट शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून किरण शिंदे या भामटया पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी किरण याला अटक केली असून त्याला न्यायालयात हाजर केले असता १९ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: cheating in marriage at Ambarnath

संबंधित बातम्या

Saam TV Live