अमेरिकेच्या फस्ट लेडी 'मेलानिया ट्रम्प' यांचं #MeToo बाबत मोठं वक्तव्य..   

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सोशल मीडियावर #MeToo मोहीम सध्या गाजत आहे. केनिया येथील दौऱ्यादरम्यान एका वृत्तवाहिने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना मेलानिया ट्रम्प म्हणाल्या, 'मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असेच मलाही वाटते. महिलांना माझा पाठिंबा असून, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. महिलाच नाही तर पुरुषांना सु्द्धा. पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी.'

पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमही अनेक बातम्या वाढवून सांगताना दिसतात. काही बातम्या अशा प्रकारे सादर केल्या जातात ज्यांची पद्धत चुकीची आहे, असेही मेलानिया ट्रम्प म्हणाल्या.

दरम्यान, हॉलिवूडमधील लैंगिक शोषण, छळ, गैरवर्तनासंदर्भात गेल्या वर्षी #MeToo ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. #MeToo ही मोहिम सध्या जगभरात सुरू आहे. भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी अन्यायाला वाचा फोडली आहे. बॉलिवूडनंतर क्रीडा, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात हे वादळ घोंगावू लागले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live