खूशखबर! अमेरिकेला कोरोनावर उपाय सापडला, उंदरावर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी

मोहिनी सोनार
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

अमेरिकोला कोरोनावर औषध सापडल्याचा दावा सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाच्या काही वैज्ञानिकांनी केलाय. दरम्यान कोरोना संक्रमित उंदरावर हा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. असं सांगण्यात आलंय 

 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसह अनेक देशांना कोरोनाने हैराण करून सोडलंय. अशातच अमेरिकेत या कोरोनाच्या शिरकावाने अनेक जीवही घेतले. मात्र सर्वांकडून प्रयत्न सुरू होते. जो तो आपापल्या परीने कोरोनावर उपाय शोधण्यात प्रयत्नशील होता. अशातच अमेरिकेला कोरोनावर औषध सापडल्याचा दावा करण्यात आलाय. 

अमेरिकेतील एका विद्यापठातील वैज्ञानिकांना कोरोनावर औषध सापडलंय आणि त्यांनी याचा प्रयोग उंदरावर करून पहिला आणि यानंतर त्या उंदराच्या शरीरात काही बदल पाहायला मिळाले जे की सुधारणा झाल्याचे होते. त्यामुळे कोरोनावर अमेरिकेसह सर्व मात करू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला कोरोनवरील या वॅक्सिनचा शोध लावला गेला. हा शोध सेंट पिटर्सबर्ग या युनिव्हर्सिटीत लावला गेला. आणि या वॅक्सिनचा प्रयोग एका उंदरावर केला गेला. यानंतर त्या उंदरावर काही यशस्वी हालचाली दिसल्या. 

त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच संपुन त्यावर मात करता येईल आशा हालचाली दिसतायेत.

कसा केला प्रयोग...

सुरुवातीला उंदराच्या शरिरात कोरोनाचे विषाणू सोडण्यात आले. त्यानंतर कोरोनावरील औषध त्यावर अप्लाय करण्यात आलं. आणि काही वेळातच त्या उंदराच्या शरिरात पॉझिटीव्ह बदल दिसायला लागले.

त्यानंतर काही वेळात हा प्राणी बरा होत असल्याचं दिसताच त्याच्यावर आणखी काही वॅक्सिन वापरण्यातही यश आलं. दरम्यान यावरुन कोरोनावर औषध सापडलंय आणि त्याचा प्राण्यांवर पॉझिटीव्ह बदल  होतोय ही दिलासादायक बाब समोर आलीय. मात्र या औषधाचा माणसाच्या शरिरावर कसा परिणाम होतो? तो याला सपोर्ट करतो का? हेही पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान अमेरिकी संशोधकांनी केलेला हा दावा कितपत खरा ठरेल हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत स्वत:ची काळजी घेऊन कोरोनापासून बचाव कसा करता येईल हे उपयुक्त ठरणार आहे.

Web Title - 


संबंधित बातम्या

Saam TV Live