हा 14 वर्षीय विद्यार्थी चालवणार पहिली लँम्बोरगिनी ट्रोफेओ इवो रेस कार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

कॅनिफोर्निया - येथील ला कॅनडा हाय स्कुलचा 14 वर्षीय विद्यार्थी स्टिवन अघाखानी हा नुकताच पहिली लँम्बोरगिनी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवो रेस कारचा मानकरी ठरला आहे. स्टिवनच्या वडिलांनी त्याला लँम्बोरगिनी एडीशनची पहिली ट्रोफेओ इवो रेस कार भेट दिली आहे. एका यु. एस. वृत्तानुसार, स्टिवनने रेसिंग कार चालविल्या आहेत. त्याने वयाच्या 7 व्या वर्षापासून रेसिंग गो कार्ट या रेसिंग प्रकारात भाग घेतला आहे.

कॅनिफोर्निया - येथील ला कॅनडा हाय स्कुलचा 14 वर्षीय विद्यार्थी स्टिवन अघाखानी हा नुकताच पहिली लँम्बोरगिनी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवो रेस कारचा मानकरी ठरला आहे. स्टिवनच्या वडिलांनी त्याला लँम्बोरगिनी एडीशनची पहिली ट्रोफेओ इवो रेस कार भेट दिली आहे. एका यु. एस. वृत्तानुसार, स्टिवनने रेसिंग कार चालविल्या आहेत. त्याने वयाच्या 7 व्या वर्षापासून रेसिंग गो कार्ट या रेसिंग प्रकारात भाग घेतला आहे. तसेच नासा प्रो सिरीज् साउर्थन कॅनिफोर्निया रिजनल चॅम्पिअनशिपमध्येही सहभाग घेतला आहे आणि सध्या त्याचे प्रशिक्षण रोलेक्स 24 रेस साठी डेटोना येथे सुरु आहे. नवी ह्युरॅकॅन सुपर ट्रोफेओ इवोची रचना लँबॉर्गिनी स्क्वाड्रा कॉर्से कडून करण्यात आली आहे. ही रचना रेसिंग चॅसीस बिल्डर दल्लारा इंजिनियरिंगच्या मदतीने करण्यात आली आहे. 'इवो' ही ह्युरॅकॅनच्या 5.2-लिटर व्ही-10 च्या रेसिंग-ट्यून व्हर्जनचे 620-हॉर्सपॉवर आणि 413 पाउंड-फिट चा टॉर्क निर्माण करणाऱ्या इंजिनवर कार्यान्वित आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live