राफेल करार, होलाँद आणि 'या' अभिनेत्रीची आहे लिंक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली- भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल कराराची प्रक्रिया चालू होती, त्याचवेळी अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंटरटेनमेंट कंपनीने फ्रांस राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांदच्या पार्टनर अभिनेत्री जूली गाएत यांच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीसोबत मिळून काम करण्याचा आणि काही चित्रपट प्रदर्शित करण्याचा करार केला होता. 

26 जनवरी 2016 ला फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राफेल करार करण्यात आला होता, त्याचदिवशी अधिकृत स्वाक्षऱ्या या करारावर करण्यात आल्या होत्या. अगदी बरोबर दोन दिवस आधी अनिल अंबानींच्या रिलायंस एंटरटेनमेंट या कंपनीने जूली गाएत यांच्या फर्म रॉग इंटरनेशनल या कंपनीसोबत करार केला होता. त्यामुळे आता राफेल कराराचा थेट संबध या अभिनेत्रीसोबत जोडण्यात येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यानुसार अधिकृत वृत्त दिले आहे याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना प्रश्नदेखिल केला आहे. राहुल यांनी म्हटले आहे मोदीजी आता तुम्ही याचे उत्तर द्या. अशा आशयाचे राहुल यांनी ट्विट केले आहे. या अभिनेत्रीसोबत संबध जोडल्याने आता नवीन चर्चांना उधाण आले आहे.
 
दरम्यान, राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष असलेले फ्रान्स्वा ओलॉंद यांनी एका मुलाखतीत केल्याचे प्रसिद्ध झाल्याने या संदर्भातील वादाला आज मोठे वळण लागले.
 
Web Title: Amid Rafale Talks, Ambani Produced 2 Films For Hollandes Partner

संबंधित बातम्या

Saam TV Live