'राज'पुत्राची राजकारणाच्या आखाड्यात एन्ट्री...

'राज'पुत्राची राजकारणाच्या आखाड्यात एन्ट्री...

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाअधिवेशनाचा कार्यक्रम आज मुंबईतील नेस्को मैदानात पार पडतोय. अशात ज्यावर सर्वात जास्त नजर होती ती म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग. या कार्यक्रमात आज अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग करण्यात आलं आहे. आजच्या कार्यक्रमात अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत नेता म्हणून निवडले गेलेत. 

नेता म्हणून निवडले गेल्यानंतर अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात प्रथमच अत्यंत महत्त्वाचे ठराव मांडले. लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे, याचसोबत महाराष्ट्रात जागतिक दर्जाची क्रीडांगणे उपलब्ध व्हावीत असं अमित राज ठाकरे यांनी म्हटलंय. 

अमित ठाकरे यांनी मांडलेला ठराव :  

लहान मुलांच्या पाठीवरच्या दपतारांचे ओझे कमी होणे आवश्यक आहे. तसंच महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्यात आत्याधुनिक सुविधा असलेले क्रीडांगणे तयार व्हावीत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण पिढीसाठी ऑनलाइन शिकवण्या सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत. असा ठराव अमित ठाकरे  यांनी मांडलाय. मला आज ठराव मांडायचा आहे हे मला काल रात्री समजलं आणि पायाखालची जमीन सरकणे काय असतं ते मला आज समजलं, असं अमित राज ठाकरे यांनी म्हटलंय.  

कुटुंबियांसाठी अत्यंत भावनिक क्षण

एकंदरच राज ठाकरे यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत भावनिक असा हा क्षण होता. अमित ठाकरे यांना स्टेजवर पाहून शर्मिला ठाकरे यांच्या अंगावर काटा आला. याच क्षणाची आपण वात पाहत होतो अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलीये. 

अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उभारी मिळण्याची शक्यता आहे. 

amit raj thackeray launched in mahamelwa of mahrashtra navanirman sena at mumbai  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com