अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच मी नजरकैदेत - संजय निरुपम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

भाजपाध्यक्ष अमित शहांच्या मुंबई भेटीच्या दौऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता मुंबई पोलिसांनी सावधानता बाळगत थेट मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनाच स्थानबद्ध केलं आहे. पोलिसांनी निरुपम यांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून निरुपमांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. लोकसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, अमित शहा आताच तयारीला लागले असून, विरोधक भाजपला पावलोपावली अडचणीत पकडण्यासाठी सज्ज झाली आहे. मंत्र्यावर होणार भ्रष्टाचाराचे आरोप, वाढणारी महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन काँग्रेस, भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करतेय.

भाजपाध्यक्ष अमित शहांच्या मुंबई भेटीच्या दौऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता मुंबई पोलिसांनी सावधानता बाळगत थेट मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनाच स्थानबद्ध केलं आहे. पोलिसांनी निरुपम यांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून निरुपमांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. लोकसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, अमित शहा आताच तयारीला लागले असून, विरोधक भाजपला पावलोपावली अडचणीत पकडण्यासाठी सज्ज झाली आहे. मंत्र्यावर होणार भ्रष्टाचाराचे आरोप, वाढणारी महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन काँग्रेस, भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळेच शहांच्या मुंबई दौऱ्यात भाजपला काँग्रेसकडून कोणताही विरोध होऊ नये, याकरताच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live