सौरवदादाला आलीये आणखी एक ऑफर?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई : आपल्या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची हवा टाईट करणारा सौरव गांगुली आता 
एका नव्या इनिंगची सुरुवात करतोय. ही इनिंग क्रिकेटच्या मैदानातली नसली, तर क्रिकेटच्या सर्वात श्रीमंत
संस्थेची आहे. गांगुली BCCIच्या अध्यक्षपदी  नियुक्त झालाय.  एकेकाळी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा दादा अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार 
BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर त्याला आता आणखी एक ऑफर आली असल्याचं सांगितलं जातंय. 
कर्णधार म्हणून दमदार कामगिरी करणारा सौरव BCCIचा अध्यक्ष म्हणून कसं काम करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहेच. पण

त्यासोबत BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सौरवदादाला चक्क राजकारणात येण्याची ऑफर आल्याचं कळतंय. 

सौरवची BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या समोर आल्यात.
त्यामुळे आता तो BCCIमध्येही 'दादागिरी' करणार का असा सवाल उपस्थित होतोय...
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन हे दोन माजी गट आमने-सामने होते. 
मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. 

त्यानंतर सौरव गांगुलीची निवड करण्यात आली. यामागे भाजपच्या बड्या नेत्यानं सूत्र हलवल्याची चर्चा आहे.
हा बडा नेता दुसरा तिसरा कोणी नसून अमित शहा असल्याचं बोललं जातंय. सौरवचा गौरव करण्यासाठी 
केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं. तसेच अमित शहांनी सौरव गांगुलीला 
भाजपात येण्याचं आमंत्रण दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे दादा भाजपात प्रवेश करणार का हे पाहवं लागेल.

Web Title : Sourav Ganguli offer To Join BJP By Amit Shah

संबंधित बातम्या

Saam TV Live