VIDEO | मुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेवर अमित शहांचं मोठं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील निवडणुकानंतर भाजपचे केंद्रातील मोठे नेते काहीच का बोलत नाही यावर अनेक दिवसांपासून चर्चा होते. अशात आता भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुढे येत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांशी चर्चा केली. तब्बल 17-18 दिवसानंतर अमित शाह आता माध्यमांसमोर आलेत. 

शिवसेनेवर ताशेरे : 
माध्यमांशी बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढलेत. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीवर केलं जाणारं राजकारण हे फक्त आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी केलं जातंय अशी भूमिका अमित शाह यांनी घेतलीये. दरम्यान, या सर्वात जास्त नुकसान  भाजपचं झालं असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलंय.   

शिवसेनेच्या काही अटी आम्हाला मान्य नव्हत्या :
शिवसेनेच्या काही अटी आम्हाला मान्य नव्हत्या.  माझ्या पक्षाचे संस्कार मला एका बंद खोलीत झालेल्या चर्चा बाहेर मांडण्याची अनुमती देत नाहीत. मात्र आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी स्वतः (अमित शाह) आणि खुद्द देवेंद्र फडणवीस हे कायम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील यावर उघडपणे बोलत होते. त्याचवेळी कोणीही त्याला आक्षेप  का घेतला नाही. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. 

राष्ट्रपती राजवट म्हणजे लोकांची फसवणूक ? 
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट म्हणजे भाजपचं नुकसान आहे. दरम्यान ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक नाही का ? असा प्रश्न विचारला असताताना ही फसवणूक आम्ही केली नाही असं स्पष्ट मत अमित शाह यांनी म्हटलंय. 

Web title : Amit shah on shiv sena and Maharashtra presidents rule in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live