अमिताभ बच्चनची प्रकृती स्थिर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

राजस्थानात शूटिंगवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांची बिघडलेली प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय. जोधपूरमध्ये शुटींगदरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती. ठग्स ऑफ हिंदोस्थान या चित्रपटाच्या शुटींगसाठी अमिताभ जोधपूरमध्ये होते तेव्हा त्यांना त्रास झाला. उपचारासाठी अमिताभ यांना तातडीनं मुंबईत आणण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पहाटे 4 वाजेपर्यंत शुटींग सुरू होतं. यावेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली. सध्या मुंबईतील तीन डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना झालीय. तर अमिताभ यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं जया बच्चन यांनी सांगितलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live