मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचे महानायक अमिताभ बच्चन यांनी टोचले कान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

आरे'मधील मेट्रो कारशेडवरून वाद सुरू असतानाच, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत मेट्रो सेवेचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी 'आरे'तील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांचेही अप्रत्यक्षपणे कान टोचले.

अमिताभ यांनी आज, ट्विट करून मेट्रो सेवेचं कौतुक केलं आहे. मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एका मित्राचं उदाहरणही दिलं. मेडिकल इमर्जन्सीवेळी मित्रानं त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला.

मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचं त्यानं परतल्यानंतर सांगितलं. खासगी वाहनापेक्षा मेट्रो सुविधा अधिक कार्यक्षम असल्याचे मित्राने सांगितल्याचे अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live