अमिताभ बच्चन यांनी फेडलं 2100 शेतकऱ्यांचं कर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

बिग बी अमिताभ बच्चन यांनी बिहारच्या २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. याची माहिती त्यांनी स्वतःच ब्लॉगवरुन दिली आहे. 'वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकले होते. त्यापैकी २१०० शेतकरी निवडले आणि ओटीएससह (वम टाइम सेटलमेंट) हे कर्ज फेडले. यापैकी काही लोकांना बोलावून कन्या श्वेता आणि अभिषेक यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले,' असे बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

जे लोक कर्ज फेडण्यास असमर्थ ठरले. त्यांना ही भेट आहे. यावेळी बिहारमधील शेतकरी असतील, असे अमिताभ यांनी यापूर्वी म्हटले होते. शेतकऱ्यांना मदत करण्याची अमिताभ यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही त्यांनी उत्तर प्रदेशमधील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. 
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, 'आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शूरवीर शहिदांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पत्नींना आर्थिक मदत करायची आहे.' 
यापूर्वीही अमिताभ यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत केली होती. वेळोवेळी ते अशी मदत करताना दिसत आले आहेत. दरम्यान, अमिताभ हे 'ब्रह्मास्त्र' या हिंदी चित्रपटात दिसणार आहेत. यात त्यांच्याबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे प्रमुख भूमिकेत आहेत.

web title: Amitabh Bachchan paid 2100 farmers loans

संबंधित बातम्या

Saam TV Live