अमिताभ बच्चन यांचा क्षयरोगाशी सामना; यकृत ७५ टक्के निकामी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लोकांना क्षयरोग (टीबी) या आजाराबाबत जागरूकतेचा संदेश देत स्वतःला क्षयरोग झाल्याचा खुलासा केला आहे. ७६ वर्षीय अमिताभ बच्चन क्षयरोग या गंभीर आजाराशी सामना करत असून, त्यांचे ७५ टक्के यकृत या आजारामुळे निकामी झाल्याचे समोर आले आहे. मागील २० वर्षांपासून त्यांचे यकृत केवळ २५ टक्केच काम करत आहे.

‘टीबीबद्दल जागरूकतेचा संदेश देताना मी नेहमी स्वत:चे उदाहरण देतो आणि तुमच्यामध्ये याबाबत जागरूकता निर्माण होईल अशी आशा करतो. मला स्वत:ला टीबी आणि हेपेटायटिस-बी झाल्याचे सर्वांसमोर सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही. टीबीमुळे माझे यकृत ७५ टक्के निकामी झाले आहे. मात्र, मी ठणठणीत आहे,’ असे अमिताभ यांनी सांगितले. टीव्हीवरील एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले.

संबंधित बातम्या

Saam TV Live