विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर चक्क अभिनेते अमिताभ बच्चन यांचा फोटो

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठाने एका विद्यार्थ्याला चक्क अभिनेते अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र असलेले परिक्षा प्रवेशपत्र दिले आहे. बीएडच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्याच्या परिक्षा पत्रावर चक्क अमिताभ बच्चन यांचा फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठावर अमित द्विवेदी या विद्यार्थ्याने हा आरोप केला आहे. अमित हा रविंद्र स्मारक महाविद्यालयाचा बी.एड. पदवीचा विद्यार्थी आहे. 'मी बी.एड. द्वितीय वर्षाच्या परिक्षेचा फॉर्म माझ्या माहितीच्या तपशीलासह व माझ्या फोटोसह भरला होता. पण जेव्हा प्रवेशपत्र मिळाले तेव्हा त्यावर अमिताभ बच्चन यांचा फोटो होता. त्यानंतर मी दुरूस्तीसाठी पुन्हा सर्व कागदपत्रे दिली आहेत. मला या प्रवेशपत्रावर परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली आहे, पण मला भीती आहे की, माझ्या गुणपत्रकावर ही अमिताभ बच्चन यांचाच फोटो येईल का..' असे मत अमित याने एएनआयशी बोलताना व्यक्त केले.

रविंद्र स्मारक महाविद्यालयाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही चूक विद्यार्थ्याकडून किंवा ज्या इंटरनेट कॅफेमध्ये त्याने फॉर्म भरला तिथून झाली असावी. 'अमित हा आमचा नियमित विद्यार्थी आहे. ही चूक अमितकडून किंवा इंटरनेट कॅफेमधून नजरचूकीने झाली असावी, तसेच विद्यापीठाकडूनही चूक झाली असावी अशी शक्यता आहे. त्यामुळे त्याला नवीन प्रवेशपत्र मिळावे' अशी माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी गुरूपेंद्र मिश्रा यांनी दिली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live