जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन, राहुल गांधींची उपस्थिती

जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन, राहुल गांधींची उपस्थिती

अमृतसर -  जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग उपस्थित होते. यावेळी विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

भारतात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची साक्ष असणाऱ्या आणि भारताच्या इतिहासातील एक दुःखद घटनेला म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण झाली. ही घटना घडली त्यावेळी जनरल डायरने निरपराध जनतेवर बेछूट गोळीबाराचे आदेश दिले होते. या घटनेची ब्रिटन सरकारने औपचारिकरित्या दोन दिवसांपूर्वीच माफी मागितली आहे.

दरम्यान, आज भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी अमृतसर येथील जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. 

अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे 13 एप्रिल 1919 रोजी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. दरम्यान, ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने या बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या शस्त्रधारी सैनिकांना तैनात करीत घेराबंदी केली. त्यानंतर त्याने कुठलाही इशारा न देता आपल्या सैन्याला लोकांवर 10 मिनिटे गोळीबार करण्याचे आदेश दिले. या घटनेत 1000 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 1500 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मात्र, ब्रिटश सरकार यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या केवळ 379 इतकी तर जखमींची संख्या 1200 इतकी सांगते.

Web Title: jallianwala bagh massacre 100 years congress president rahul gandhi reach amritsar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com