अमृतसरमध्ये भरधाव ट्रेनने चिरडलं शेकडो नागरिकांना.. 60 पेक्षा अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला. रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान रेल्वे ट्रॅकवर उभं राहून कार्यक्रम पाहणाऱ्या नागरिकांना भरधाव जाणाऱ्या ट्रेनने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडलीये. या अपघातात 60 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती ही व्यक्त केली जात आहे. या रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पंजाब सरकारनं प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

दरम्यान, अमृतसरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेबाबत सर्वांनी नवज्योत सिंग सिंद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. नवज्योत कौर सिद्धू या रावणदहन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. नवज्योत कौर सिद्धू या कार्यक्रमाला तब्बल दीड तास उशिरानं आल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी झाली. अनेक लोकं रेल्वे रुळावर गेली आणि अशातच हा भीषण अपघात झाला.

अपघातानंतरही त्यांनी या ठिकाणी थांबत लोकांची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. नवज्योत कौर सिद्धू यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यांनी काल रात्रीच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 

दरम्यान आता जखमी झालेल्या अनेकांवर अमृतसरच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पंजाबचे मंत्री सिद्धू यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live