महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणतात...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्रात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हायला हवी. राजकीय नेत्यांना सद्बुद्धी येवो आणि आपण कुठे आहोत ते लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यायला हवा असं मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये 'कोकण प्रांत' नावाचं अस्सल कोकणी खाद्य पदार्थांचं रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी अमृता फडणवीस यांनी मुलाखत दिली.   

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तेचा वाटा अधिक मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू राहिली. परिणामी निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला, तरीही महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. एकीकडे अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी सावरण्याचे आव्हान उभे असताना, बहुमत मिळालेली युती सत्तेच्या वाट्यासाठी भांडत असल्याचे चित्र महाराष्ट्रात उभे राहिले आहे. हा पोरखेळ थांबवावा, अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. या भावनेचे प्रतिबिंब सोशल मीडियातही उमटले आहे. 

शपथविधीची तयारी सुरू
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी (ता. ५) शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर सोहळ्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आमदार प्रसाद लाड व कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे या सोहळ्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागालादेखील तयार राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेची सर्वप्रथम संधी देतील, हे निर्विवाद असल्याने भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी करण्याची तयारी सुरू केली. भाजपचे किमान नऊ मंत्री शपथ घेतील, असा दावा करण्यात येत असून, यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राज्यपाल भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांची मुदत देतील. या कालावधीत शिवसेनेची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होतील, असे सूत्रांचे मत आहे.

Webtitle : amruta fadanavis on maharashtra government formation crisis  

संबंधित बातम्या

Saam TV Live