मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनी क्रूझच्या टोकावर जाऊन काढलेला सेल्फी सोशल मीडियावर ट्रोल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

एकीकडे सेल्फी काढणं जीवावर बेतू शकतं, हे माहित असूनही चक्क मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सेल्फीचा मोह आवरला नाहीये. क्रूझच्या टोकावर जाऊन अमृता फडणवीस यांनी काढलेला सेल्फी सोशल मीडियामध्ये चांगलाच ट्रोल होतोय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतलाय. त्या एकट्याच अगदी टोकावर गेल्या आणि तिथे त्यांनी सेल्फी काढलाय. मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आलीय.

यावेळेस अमृता फडणवीस या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यावेळेस त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही. त्यांच्या सेल्फी प्रेमाचं कौतुक करायचं की जीव धोक्यात घातला म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडल्याचं दिसून आलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live