खासदार अनंत गीतेंचा उलटा प्रवास सुरू - सुनील तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

चिपळूण - विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेला रिंगणात उतरविले, तेव्हा राष्ट्रवादीकडे केवळ २०० मते होती. परंतु राजकीय आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या शरद पवार या जागतिक विद्यापीठाच्या सानिध्यात राहून ६०० मतांचा टप्पा कधी पार केला हे अनंत गीतेंना समजू शकले नाही. गीतेंचे आकडेमोड करण्याचे दिवस संपले. त्यांचा परतीचा मार्ग सुरू झाला आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिपळूण येथे केली. भाजप सरकारच्या काळात सर्व क्षेत्रातील नागरिक त्रस्त आहेत.

चिपळूण - विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेला रिंगणात उतरविले, तेव्हा राष्ट्रवादीकडे केवळ २०० मते होती. परंतु राजकीय आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या शरद पवार या जागतिक विद्यापीठाच्या सानिध्यात राहून ६०० मतांचा टप्पा कधी पार केला हे अनंत गीतेंना समजू शकले नाही. गीतेंचे आकडेमोड करण्याचे दिवस संपले. त्यांचा परतीचा मार्ग सुरू झाला आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिपळूण येथे केली. भाजप सरकारच्या काळात सर्व क्षेत्रातील नागरिक त्रस्त आहेत. भाजपच्या विरोधी पुरोगामी विचार करून लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

येथील माटे सभागृहात झालेल्या सभेत तटकरे म्हणाले की, मागील लोकसभेच्या निवडणुकीत देशात मोदींची लाट होती. युतीचे देशातील उमेदवार लाखोंच्या मताधिक्‍याने निवडून आले. अनंत गीतेंचा केवळ अडीच हजार मतांनी विजय झाला.

कमी मताने पडणारा देशातील मी एकमेव उमेदवार असेन. चार वर्षात सावित्रीच्या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. शिक्षक आमदार आणि स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक जिंकली. याच पद्धतीने पदवीधरची जागा आम्ही कशी जिंकू ते गीतेंना कळणार नाही. 

मोदी सरकारच्या काळात जातीवाद वाढला आहे. लोक जातीच्या आणि धर्माच्या नावावर लढत आहेत. महिलांवर, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत. उद्योगक्षेत्राची गती मंदावली आहे. विकास केवळ मोदींचा झाला आहे. अच्छे दिन केवळ मोंदींचेच आले. भाजप सरकारने शिक्षकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. सरकारकडून घटनेच्या विरोधात काम सुरू आहे. जाती, धर्माचे राजकारण करण्यासाठी अभ्यासक्रम बदलले जात आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप अपयशी झाल्याची टीका तटकरे यांनी केली.

आमदार जाधव, निकमांची गैरहजेरी
राष्ट्रवादीच्या या मेळाव्याला जिल्ह्याचे प्रभारी भास्कर जाधव आणि माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांची अनुपस्थिती जाणवली. मात्र निकम यांच्या पत्नी पूजा निकम व जाधवांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी दोन्ही नेत्यांची जागा भरून काढली.


संबंधित बातम्या

Saam TV Live