अंधेरी ते बांद्रा दरम्यान ठप्प झालेली रेल्वे वाहतूक ट्रॅकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

अंधेरीत रेल्वे रुळावर गोखले पूलाचा काही भाग कोसळल्यामुळे सकाळपासून बांद्रा ते अंधेरी दरम्यान ठप्प झालेली रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे... आता पश्चिम रेल्वेच्या हार्बर, जलद आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. दुर्घटनेनंतर तब्बल 12 तासांनी रात्री आठच्या सुमारास अंधेरीहून-चर्चगेटच्या दिशेने अप जलद मार्गावर पहिली लोकल रवाना झाली. अंधेरीत रेल्वे रुळावरुन ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळल्यामुळे, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live