दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जानेवारी 2018

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालीय. भराडी देवीच्या दर्शनासाठी आज पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात.. या वर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. या भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळानं व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live