मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जातांना प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावचा अपघात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 मे 2018

लोणावळा - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांचा आज सकाळी अपघात झाला. या अपघातात अनिकेत विश्वासराव सुखरुप आहे. पण प्रार्थना बेहेरेच्या हाताला मार लागला आहे.  

आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास अपघात झाला. मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन जाताना लोणावळ्याजवळ प्रार्थना आणि अनिकेतच्या गाडीला हा अपघात झाला. दरम्यान प्रार्थनाला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

या गाडीत प्रार्थना, अनिकेत, प्रार्थनाची सहाय्यक स्वाती आणि ड्रायव्हर होता. स्वाती हिच्या डोक्यालाही मार लागला आहे. प्रार्थना आणि स्वातीवर लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. हा टेम्पो चुकवण्याच्या नादात गाडीला अपघात झाला.  

संबंधित बातम्या

Saam TV Live