अनिल अंबानींची संपत्ती 42 अब्ज डॉलर वरून 52.3 कोटी डॉलरवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

त्यांच्या काही कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर असा आहे,

रिलायन्स कॅपिटल - 46,400 कोटी रुपये
रिलायन्स कम्युनिकेशन्स - 47,234 कोटी रुपये
रिलायन्स होम फायनान्स - 13,120 कोटी रुपये
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर - 23,144 कोटी रुपये
रिलायन्स नेव्हल अॅंड इंजिनियरिंग - 10,689 कोटी रुपये
रिलायन्स पॉवर - 31,697 कोटी रुपये

अनिल अंबानी समूहावरील कर्जाची व्याप्ती वाढतच चालल्यामुळे अनिल अंबानींच्या संपत्तीत मोठीच घट झाली आहे. अनिल अंबानी आता अब्जाधीश राहिले नाहीत. 2008 मध्ये 42 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अनिल अंबानींची संपत्ती आता फक्त 52.3 कोटी डॉलर (3,651 कोटी रुपये) इतकीच आहे. यात अंबानींच्या कंपन्यांचे जे शेअर तारण म्हणून ठेवलेले आहेत त्यांच्याही मूल्याचा समावेश आहे. जर तारण ठेवलेल्या शेअरचे मूल्य काढून टाकले तर अनिल अंबानींची संपत्ती फक्त 765 कोटी रुपये इतकीच राहिली आहे.

अनिल अंबानींच्या संपत्तीचे मूल्य झपाट्याने घटते आहे. अवघ्या चार महिन्यांआधी त्यांच्या रिलायन्स समूहाचे मूल्य 8,000 कोटी रुपये होते. विशेषत: रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील आपला 42.88 हिस्सा अंबानींनी विकल्यानंतर तर त्यांच्या संपत्ती आणखीच घट झाली आहे. मार्च 2018 मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर एकूण 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज होते. वेगवेगळ्या कंपन्यांवरील कर्जांची परतफेड करता करता अनिल अंबानी यांनी आपले सर्व साम्राज्यच गमावले आहे

त्यांच्या काही कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर असा आहे,

रिलायन्स कॅपिटल - 46,400 कोटी रुपये
रिलायन्स कम्युनिकेशन्स - 47,234 कोटी रुपये
रिलायन्स होम फायनान्स - 13,120 कोटी रुपये
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर - 23,144 कोटी रुपये
रिलायन्स नेव्हल अॅंड इंजिनियरिंग - 10,689 कोटी रुपये
रिलायन्स पॉवर - 31,697 कोटी रुपये

त्यातच ऑडिटर्सनेसुद्धा रिलायन्सच्या आर्थिक कामगिरीवर ताशेर ओढत त्यांच्या व्यवसायाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अनिल अंबानी यांच्यासाठी आगामी काळ आणखीच खडतर असण्याची चिन्हे आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live