अण्णा हजारेंचा सरकारला 30 जानेवारी पर्यंतचा अल्टीमेटम; आजचं उपोषण स्थगित  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने उचललेल्या पावलांमुळे काही आशेचे किरण दिसत असल्याचं अण्णा हजारे म्हणालेत. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गांधी पुण्यतिथी म्हणजेच 30 जानेवारी २०१९ रोजी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलंय.    

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेलं निवेदन घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीमध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान, गिरीश महाजन यांना अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यात यश आलंय. अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, अण्णांच्या मागण्या केंद्राकडे पाठवल्या असून त्याबद्दल केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.          
 
WebTitle : marathi news anna hazare postponed his hunger strike after meeting with girish mahajan 

संबंधित बातम्या

Saam TV Live