जनलोकपाल, निवडणूक सुधारणा या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अण्णा 'रामलीला' मैदानात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आजपासून दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केलंय. जनलोकपाल, निवडणूक सुधारणा या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शहीद दिनाचं औचित्य साधून, अण्णांनी आंदोलनाची हाक दिलीय. दरम्यान सरकार आमच्या आंदोलनात खोडा घालत असल्याचा आरोप, अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर केला आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या बस, रेल्वे सरकारने रोखल्या आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असे होता कामा नये, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live